सातपुड्यातील लसणीबर्डी येथे राबविला उपक्रम.
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
प्रतिनिधी I भुसावळ
भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील लसणीबर्डी आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १३५ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, पुरुषांना कपडे,ब्लॅकेट, आंघोळीचे रुमाल, स्वेटर, फराळ, शैक्षणिक साहित्य, पणत्या, बिस्किट, चॉकलेट आणि यांचे वाटप करण्यात आले.
दीपाेत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद तर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गाेड करू या’ असे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांतर्गत गाेळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील नागादेवी येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आले. यंदा उपक्रमाचे नववे वर्ष होते.
उपक्रमाचे दाते
राजेश्वरी संधानशिवे, ऍड.बोधराज चौधरी, डॉ.नीलिमा नेहते, राजू बोडे, अजबसिंग पाटील, रागिणी चव्हाण, जयेश राणे, अजय कोळी, परीक्षित पवार, विकास वराडे, मनीषा घुले, सुनील पटेल, हरीश फालक, लैलेश मास्टे जितेंद्र बऱ्हाटे, मनोज पाटील, अन्यना शिरसाठ, कविता महाले, किशोर पाटील, हेमांगिनी चौधरी, कुंदन सोनवणे, सीमा चौधरी, क्रांती सुरवाडे, अलका देवगिरीकर, नितीन लोखंडे, भूषण कोटेचा, अलका सुरवाडे, मिलिंद बोडे, दुर्गेश चौधरी, डॉ.मनोज चौधरी, धन्यानेश्वर मोरे, किरण पाटील, भरत बऱ्हाटे, प्रकाश बेलसरे, विनोद अग्रवाल, छाया पाटील, सचिन पाचपांडे, तात्यासाहेब करांडे, संदीप पाटील( शेमलदा), संदीप सोनगरे, किशोर माचवे, देवानंद पाटील, जयेश महाजन, अभिषेक चौधरी, अतुल चौधरी, एस आर चौधरी, श्रीकांत मोटे, अतुल पाटील, धीरज चौधरी, गजानन सेवलकर, मुकुल ढाके, निवृत्ती पाचपांडे, स्मिता जोशी, अंजली ठाकूर, सुनील पाटील, राजू गायकवाड, प्रवीण सनेर, भारती अवचरे, धन्यानेश्वर मेडिकल, माधव पाटील, अमोल जावळे, समाधान इंगळे, हर्षल बोरोले, राजेंद्र सपकाळे, स्मिता जोशी, वरून इंगळे, नारायण पाटील, दिलीप ललवाणी, विजय वारके, विनोद चोरडिया, किरण कोलते, दीपक तेली, ज्योती साळुंके, रामलाल कचरे, विकास वारके, प्रमोद पाटील, विलास बेंद्रे, विपीन जावळे, संदीप सोनार, विशाल महाजन. मुकुल ढाके, डॉ.रवींद्र माळी, केशव झांबरे, छगन पवार, विनोद शेजवलकर, गिरीश महाजन या दात्यांनी उपक्रमाला सहकार्य केले.
प्रकल्प प्रमुख अमित चौधरी, समन्वयक समाधान जाधव, सहसमन्वयक विक्रांत चौधरी आणि तेजेंद्र महाजन, योगेश इंगळे, डॉ.संजू भटकर, प्रदीप सोनवणे, जीवन महाजन, शैलेंद्र महाजन, प्रसन्ना बोरोले, केतन महाजन, विपिन वारके, हितेंद्र नेमाडे, कपिल धांडे, डॉक्टर रवींद्र माळी,हरीश भट, हर्ष मालवीय, अमित कुमार पाटील, राहुल भारंबे, राजू वारके, शाम दुसाने, ज्ञानेश्वर घुले, मिलिंद राणे, समाधान भोई, शिरीष कोल्हे, तुषार भोळे, दुर्गेश चौधरी, शिरीष नेमाडे, धीरज सूर्यवंशी, संजू चौधरी, हर्षा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
अंतर्नादतर्फे गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले हाेते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसाेबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे, अशी भावना अंतर्नाद प्रतिष्ठानचे सदस्य जीवन महाजन यांनी व्यक्त केली.
उपक्रमाला मिळाले व्यापक स्वरुप
‘वाटीभर फराळ आणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जाेरदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे या उपक्रमास व्यापक स्वरुप मिळाले आहे. भविष्यात हा उपक्रम लाेकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्प समन्वयक समाधान जाधव यांनी दिली. शहरी लाेक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा आनंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.