Saturday, April 18, 2026
Homeभुसावळनिष्ठावान सेवेचा सन्मान भुसावळ मंडळात १०७ रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव

निष्ठावान सेवेचा सन्मान भुसावळ मंडळात १०७ रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव

भुसावळ : प्रतिनिधी

भुसावळ रेल्वे मंडळात मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी रेल्वे सेवा पुरस्कार समारंभाचे भव्य व सन्माननीय आयोजन करण्यात आले. या समारंभात विविध विभागांतील १०७ रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्य व निष्ठावान सेवेसाठी मंडळ रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते रेल्वे सेवा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी मंडळ रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना कर्तव्यपालनात निष्ठा ठेवून भविष्यातही उत्कृष्ट कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच रेल्वेच्या प्रगतीसाठी सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचे नमूद करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

या कार्यक्रमासाठी अपर मंडळ रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास अपर मंडळ रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) मुकेश कुमार मीना, वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी दिलीप रं. खरात यांच्यासह मंडळातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश व्यास यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहायक कार्मिक अधिकारी व्ही. एस. वडनेरे यांनी केले. समारंभ यशस्वी करण्यासाठी कार्मिक व कल्याण विभाग, जनसंपर्क विभाग, वैद्यकीय, अभियांत्रिकी, एस. अँड टी., विद्युत विभाग तसेच रेल्वे सुरक्षा दल यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या