Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगपंतप्रधान नरेंद्र मोदी बनले भाजपचे सक्रीय सदस्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले भाजपचे सक्रीय सदस्य

नवी दिल्ली : भाजपने आजपासून (बुधवार दि.१६) सक्रिय सदस्यत्व अभियान सुरू केले आहे. य़ाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिले सक्रीय सदस्यत्व घेत या अभियानाची सुरूवात केली. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस आणि सदस्यता अभियान प्रमुख विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. या अभियानामुळे सक्रिय सदस्यत्व घेणाऱ्यांना विशेष महत्त्व दिले जाणार आहे.

हे अभियान सुरू करताना पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर म्हणाले की, विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नांना आम्ही गती देत आहोत. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत प्रथम सक्रिय सदस्य बनण्याचा आणि सक्रिय सदस्यत्व अभियान सुरू केल्याचा अभिमान वाटतो. ही अशी चळवळ आहे जी तळागळात आमचा पक्ष आणखी मजबूत करेल आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी आमच्या पक्ष कार्यकर्त्यांचे प्रभावी योगदान सुनिश्चित करेल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या