जळगाव : रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दुरक्षेत्र हद्दीत शेरीनाका येथे नाकाबंदी दरम्यान अवैधरित्या विना परवाना म्हशींची वाहतुक करणाऱ्या ४ वाहनांसह ३३ म्हशी असा एकूण ६४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंगळवारी (दि.१५) रोजी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाल्याने रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते ,तसेच सहा.पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह (फैजपुर) व पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या पाल दुरक्षेत्र येथील शेरीनाका येथे पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील, जगदीश लिलाधर पाटील, ईश्वर जुलालसिंग चव्हाण, हमीद हमजान तडवी ड्युटीवर होते.