प्रतिनिधी I रावेर
रावेर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अमोल जावळें यांनी रावेर तालुक्यातील संवाद दौऱ्यात पुनखेडा, पातोंडी, निंभोरासीम, धुरखेडा, थेरोळा, बोहर्डे, खिरवड, नेहते, दोधे, अटवाडे, मोरगाव बु, मोरगाव खु. या गावांमध्ये प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधला. महायुती सरकारने घेतलेल्या सर्वसमावेशक आणि लोककल्याणकारी निर्णयांबद्दल जनतेत असलेला विश्वास, नागरिकांच्या उत्साही आणि आनंदी प्रतिसादातून स्पष्टपणे दिसून आला.
युवक, ज्येष्ठ नागरिक, आणि महिलांचे मोठ्या उत्साहात अमोल जावळे यांना रॅलीमध्ये भेटणे सुरू असून, ते भक्कम विजयाची खात्री देत आहेत. “घरोघरी कमळ” हे मिशन महायुतीचे कार्यकर्ते प्रभावीपणे राबवित आहेत. अमोल जावळे यांच्या जनतेशी थेट संवादामुळे प्रत्येक गावात त्यांनी आपला ठसा सोडला आहे, आणि त्यांना ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद व युवामंडळींचे पाठबळ मिळत आहे. त्यांच्या कार्यप्रणालीमुळे गावागावात जनतेचा उत्साह वाढला आहे, ज्यामुळे त्यांच्या विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
दौऱ्यात सुरेश धनके, प्रल्हाद पाटील, समाधान पाटील,वाय.व्ही.पाटील ,हरलाल कोळी, प्रवीण पंडित पाटील, राजन लासुरकर खिरवळ, दुर्गादास पाटील ,संजय पाटील, विजय महाजन, जितू पाटील, गोपाळ नेमाडे,खेबू पाटील, संजय पाटील ,चंदू पाटील ,महेंद्र पाटील,चेतन पाटील अध्यक्ष युवा मोर्चा ,आशाताई सपकाळे अध्यक्ष महिला मोर्चा, स्वातीताई भंगाळे, राजू पाचपोळे ,सुनील पाटील, सिकंदर तडवी यांच्यासह भाजप महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते, तरुण मित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.