Monday, December 23, 2024
Homeराजकारणरावेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचा यावल मंडळातील संवाद दौरा:...

रावेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचा यावल मंडळातील संवाद दौरा: जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी I यावल 

रावेर  विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अमोल जावळें यांनी संवाद दौऱ्यात यावल मंडळातील चितोडा, डोंगर कठोरा परिसरात प्रचारात नागरिकांशी संवाद साधला. गावांमध्ये प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधला. महायुती सरकारने घेतलेल्या सर्वसमावेशक आणि लोककल्याणकारी निर्णयांबद्दल जनतेत असलेला विश्वास, नागरिकांच्या उत्साही आणि आनंदी प्रतिसादातून स्पष्टपणे दिसून आला. 

येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करून रावेर यावल विधानसभा क्षेत्रात विकासाचे कमळ फुलवून सेवेची  संधी देण्याचे विनम्र आवाहन केले. या प्रचार दौऱ्यात माता भगिनी आणि नागरिकांकडून केलेले स्वागत हे अभूतपूर्व होते.

यावेळी माझ्यासोबत हर्षल पाटील, नारायणबापू चौधरी, सविता भालेराव, राकेश फेगडे, नितीन चौधरी, सागर महाजन, नितीन व्यंकट चौधरी, प्रदीप कोळी, भारत पाटील, सागर महाजन, जयश्री चौधरी, अमृत सोळुंके, कांचन फालक, पिंटू राणे, भारती चौधरी, योगेश भंगाळे, भूषण नेहते भाजपा महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू, तरुण मित्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या