प्रतिनिधी I फैजपूर
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा रविवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता फैजपूर येथील जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मैदान, फैजपूर-हबर्डी तसेच फैजपूर-यावल रोडवर, बऱ्हाणपूर-अंकलेश्वर हायवेवरील साखर कारखान्याजवळ आयोजित करण्यात आली आहे.
रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, तसेच जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत.
महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.