रावेर प्रतिनिधी । रावेर मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर व यावल तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसे पत्र समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.
रावेर-यावल विधानसभा मतदार संघासाठी महायुतीचे भाजपचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांचा प्रचार सुरू आहे. दरम्यान रावेर व यावल तालुक्यातील संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित अहिल्या महिला संघाच्या मल्लारसेना च्या वतीने त्याबाबत असे पत्र देण्यात आले आहे. याप्रसंगी यावल तालुका मल्हार सेना अध्यक्ष रवींद्र कुवर, प्रकाश काटकर, किरण काटकर, शरद काटकर, यशवंत काटकर, गणेश काटकर, राहुल कचरे, पंडित सोनवणे, प्रभाकर कचरे, संतोष बोरसे, समाधान बोरसे, अनिल काटकर, उखा कसरे, संजय कचरे, अनिल निळे, संदीप घोटे, चंद्रकांत सावळे, रमेश सावळे, अनिल सावळे, सुधाकर नमायते, भास्कर नमायते, रमण काटकर, संजय कुवर, सुभाष काटकर, अरुण काटकर, लक्ष्मण काटकर, सागर काटकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.