Saturday, December 21, 2024
Homeरावेरबक्षीपुर व पाल वीजपुरवठा सुधारण्यासाठी आमदार अमोल जावळे यांची ठोस पावले

बक्षीपुर व पाल वीजपुरवठा सुधारण्यासाठी आमदार अमोल जावळे यांची ठोस पावले

प्रतिनिधी | रावेर

बक्षीपुर आणि पाल परिसरातील वीजपुरवठा समस्या सोडवण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या प्रसंगी मुख्य अभियंता मुलानी यांच्याशी चर्चा करून बक्षीपुर आणि पाल उपकेंद्रांमध्ये 5 MVA क्षमतेचे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी चार महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

या भागातील शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा, अपुरा वीजपुरवठा, लो व्होल्टेज आणि कर्मचारी टंचाई यांसारख्या समस्या जाणवत होत्या. यावर उपाय म्हणून आजच दोन वायरमन नियुक्त करण्यात आले असून, लो व्होल्टेज समस्येवर उपाय म्हणून पुढील 2-3 दिवसांत सर्व ठिकाणी कॅपेसिटर बसवले जातील. यामुळे वीजपुरवठा अधिक स्थिर व गुणवत्तापूर्ण होईल.

बैठकीला अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. पाटील, उप कार्यकारी अभियंता श्री. मराठे, भाजपाचे पदाधिकारी सुरेश धनके, सी. एस. पाटील, पी. के. महाजन यांच्यासह परिसरातील सरपंच आणि शेतकरी उपस्थित होते. बक्षीपुर, पाल, खिरोद प्र.रा., रासलपूर, जिन्सी व परिसरातील नागरिकांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार असून शेती व अन्य उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या