प्रतिनिधी l
नामदार श्री गिरीभाऊ महाजन यांची तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याने यावल व रावेर भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाके फोडून आणि जल्लोष करत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साह व्यक्त केला. सोबतच आमदार गुलाबराव पाटील आणि आमदार संजय सावकारे यांचीही मंत्रीपदी निवड झाल्याने तिनही नेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी महाजन आणि सावकारे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आणि त्यांच्या नेतृत्त्वात राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते. नागरिक व समर्थकांनी या नेत्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.