Home Blog महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना कोळी महासंघाचा जाहीर पाठिंबा

महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना कोळी महासंघाचा जाहीर पाठिंबा

0

प्रतिनिधी: रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांना कोळी महासंघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. कोळी समाजाच्या वतीने अधिकृत पत्र देऊन हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.

महायुतीच्या प्रचार मोहिमेला बळ देण्यासाठी, रावेर आणि यावल तालुक्यातील कोळी समाजाने एकत्रित येत अमोल जावळे यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केला आहे. या पाठिंब्याची अधिकृत घोषणा कोळी महासंघाचे रमेशदादा पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, आणि सरचिटणीस राजहंस टपके यांच्या स्वाक्षरी असलेल्या पत्राद्वारे करण्यात आली.

यावेळी अनेक मान्यवर आणि समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी या पाठिंब्याला आपले समर्थन दर्शवले. यामध्ये कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष हरिलाल कोळी, सागर कोळी, अनिल कोळी, शंकर सपकाळे, नितीन तायडे, प्रसाद कोळी, ईश्वर कोळी, राम कोळी, विलास कोळी, कुणाल कोळी, भगवान कोळी, मधुकर कोळी, पांडुरंग कोळी, सुभाष कोळी, दीपक कोळी, दिलीप पाटील, डॉ. स्वप्नील साळुंके, संतोष सपकाळे, ललित तायडे, हिम्मत शंकपाळ, प्रदीप कोळी, जितू कोळी, भीमराव तायडे आणि सचिन तायडे यांचा समावेश होता.

या पाठिंब्यामुळे रावेर आणि यावल तालुक्यात महायुतीच्या प्रचार मोहिमेला नवे बळ मिळाले आहे. कोळी समाजाच्या या निर्णायक पाठिंब्यामुळे निवडणुकीतील समीकरणे महायुतीच्या बाजूने अधिकाधिक मजबूत होत आहेत, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here