Thursday, January 15, 2026
HomeBlogरावेर विधानसभा मतदार संघातील महायुती उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी जयश्रीताई जावळे...

रावेर विधानसभा मतदार संघातील महायुती उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारासाठी जयश्रीताई जावळे यांचा संवाद दौरा संपन्न

प्रतिनिधी I यावल 

रावेर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारार्थ सौ. जयश्रीताई अमोल जावळे यांनी यावल मंडळातील सांगवी परिसरात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महायुती सरकारच्या युवक आणि युवतींच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांबद्दल युवकांच्या मनात असलेला विश्वास ठळकपणे दिसून आला.

येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करून रावेर-यावल विधानसभा क्षेत्रात विकासाचे कमळ फुलवून महायुतीचे उमेदवार श्री. अमोलदादा हरिभाऊ जावळे यांना आपल्या सेवेची संधी देण्याचे विनम्र आवाहन सौ. जयश्रीताई अमोलदादा जावळे यांनी केले.

यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू भगिनी, तरुण मित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या