रावेर/यावल : 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपल्या हक्काचा वापर जबाबदारीने आणि विचारपूर्वक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदारसंघातील एका उमेदवारावर गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप असून त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, गोळीबार, आणि विविध गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या व्यक्तीला शहरातून तडीपार करण्यात आले होते. अशा व्यक्तीला निवडून देणे समाजाच्या सुरक्षिततेसाठी धोका ठरू शकते, असा इशारा नागरिकांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांत मतदारसंघातील शांतता आणि विकास बिघडवण्यामागे गुंडगिरी आणि गैरप्रकार कारणीभूत ठरले आहेत. शिक्षण, उद्योगधंदे, आणि तरुण पिढीचे भवितव्य उध्वस्त करणाऱ्या या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणे योग्य नाही, असे स्थानिकांनी मत व्यक्त केले आहे.
मतदानाच्या वेळी उमेदवारांची पार्श्वभूमी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या स्थानिक उमेदवारांना निवडून दिल्यास मतदारसंघाचा सर्वांगीण विकास शक्य होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
“मतदान करा, पण विचारपूर्वकच!” असे आवाहन समाजातील सुजाण नागरिकांकडून होत आहे. मतदारांनी आपल्या मताचा योग्य उपयोग करून मतदारसंघाच्या भविष्याला दिशा द्यावी, असा संदेश निवडणूक प्रचारादरम्यान दिला जात आहे.