Thursday, January 15, 2026
Homeजामनेर"आई-वडील आणि गुरूंच्या सन्मानातून जीवनाला दिशा मिळते" : जीवन महाजन

“आई-वडील आणि गुरूंच्या सन्मानातून जीवनाला दिशा मिळते” : जीवन महाजन

प्रतिनिधी I जामनेर

“जीवन यशस्वी करण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान, वेळेचे व्यवस्थापन, आणि कष्ट करण्याची मानसिक तयारी महत्त्वाची आहे. अपयशातून धडा घेण्याची वृत्ती विकसित करणे आणि कठीण विषय सोप्या पद्धतीने शिकण्याची कला आत्मसात करणे आवश्यक आहे. जीवनात आई-वडील आणि आध्यात्मिक गुरूंचे महत्त्व ओळखून त्यांचा सन्मान करावा. याशिवाय, सुयोग्य मित्रांची निवड आणि मोबाईलचा विचारपूर्वक आणि मर्यादित वापर यावर भर द्यावा”,  असा सल्ला व्याख्याते जीवन महाजन यांनी दिला.

श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालय, पाळधी, तालुका जामनेर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. ‘गुरुमंत्र यशस्वी जीवनाचे’ या विषयावर भुसावळ येथील सेंटलायसेस स्कुलचे शिक्षक, व्याख्याते जीवन महाजन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर मा.मुख्याध्यापक एस. एन. पाटील, पर्यवेक्षक बी एन जोशी, नाना सुशिर, बाविस्कर गुरुजी हे उपस्थित होते. या सहशालेय उपक्रमाचे आयोजन उपक्रमाचे समन्वयक उपशिक्षक संतोष भारंबे यांनी केले होते.

अर्जुन-द्रोणाचार्य, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या महान व्यक्तींनी संघर्ष आणि कठोर परिश्रमातून यश मिळवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. आज आपण सर्व सुविधा उपलब्ध असताना त्यांच्यापेक्षा अधिक उत्तम कार्य करण्याची संधी आहे, अशी प्रेरणा जीवन महाजन यांनी विद्यार्थ्यांना दिली.

“चलो मिलकर अपने इस सुंदर देश के लिए कुछ ऐसा महान कार्य करें, जिससे हमारे देश का नाम पूरी दुनिया में रोशन हो जाए!” असा संकल्प करून विद्यार्थ्यांना देशासाठी प्रेरणादायी कार्य करण्याचे आवाहनही जीवन महाजन यांनी या प्रसंगी केले.

या सहशालेय उपक्रमाचे आयोजन उपक्रम समन्वयक उपशिक्षक संतोष भारंबे यांनी केले. यावेळी बाविस्कर गुरुजींनी आपल्या कवित्वपूर्ण शैलीत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रवींद्र खोडपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. एन. जोशी यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या