भुसावळ / प्रतिनिधी
भुसावळ येथील काशिराम नगर, खळवाडी परिसरात प.पू. ह.भ.प. वै. जगन्नाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ‘श्रीमद् भागवत कथा व अखंड नामसंकीर्तन सप्ताहा’ला ३० मेपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. हा सप्ताह ६ जून २०२६ पर्यंत भक्तिमय वातावरणात पार पडणार असून परिसरात आध्यात्मिक उर्जा संचारली आहे.
या सप्ताहाचे निरूपण ह.भ.प. संजय महाराज (बामणोद) यांच्या अमृतमय व रसाळ वाणीतून होत असून, त्यांच्या प्रवचनांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आयोजकांनी सर्व वैष्णव भक्तांना या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
दैनंदिन कार्यक्रम असे:
काकडा आरती : सकाळी ४:३० ते ६:३०
श्रीमद् भागवत कथा : सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ४
हरिपाठ : सायंकाळी ४ ते ६:३०
हरी कीर्तन : रात्री ८ ते १०
सप्ताहात दररोज विविध मान्यवर कीर्तनकारांची सेवा लाभणार आहे. यामध्ये ह.भ.प. नितुराजी महाराज, दत्तात्रय महाराज, दिपक महाराज, शरद महाराज व हेमंत महाराज यांचा समावेश असून, गायनाचार्य, मृदंगाचार्य व इतर सेवेकऱ्यांचीही उपस्थिती राहणार आहे.
सप्ताहाची सांगता शनिवार, दि. ६ जून रोजी होणार असून यानिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता दिंडी सोहळा आणि रात्री ८ ते १० या वेळेत काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी भाजपा गटनेते युवराज लोणारी, सामाजिक कार्यकर्ते कपिल लोणारी, कमलबाई कोळी, छगन चौधरी, संजय भारंबे, मीना लोणारी, उद्धव झांबरे, रमेश चौधरी तसेच श्री छत्रपती ग्रुप व जय भवानी नवदुर्गा मंडळ परिश्रम घेत आहेत.

